Welcome

Slide 1

ज्ञानपीठ पुरस्कार सोहळा

२२ वा ज्ञानपीठ पुरस्कार (१९८७), १७ सप्टेंबर १९८८ रोजी
कुसुमाग्रज तथा वि.वा. शिरवाडकर यांना जाहिर झाला.

Slide 2

कुसुमाग्रजांची साहित्य संपदा

विष्णु वामन शिरवाडकर तथा तात्यासाहेब शिरवाडकर (जन्म : नाशिक, २७ फेब्रुवारी १९१२; मृत्यू : १० मार्च १९९९) हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार कथाकार व समीक्षक होते. त्यांनी कुसुमाग्रज या टोपणनावाने कवितालेखन केले. ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठीतले महत्त्वाचे लेखक मानले जातात. वि.स. खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक होते.

Slide 3

वृक्षारोपणाने शुभारंभ

नाशिकचा मानबिंदू असलेले सगळ्यांचे तात्या म्हणजेच कुसुमाग्रज यांच्या विचारांनी प्ररित होऊन मराठी भाषेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी जनाजनात, मनामनात कुसुमाग्रजांचे विचार रुजविण्यासाठी “कुसुमाग्रज विचार मंच” या संस्थेचा वृक्षारोपणाने शुभारंभ.

previous arrow
next arrow
Shadow

ज्ञानपीठ पुरस्कार सोहळा

२२ वा ज्ञानपीठ पुरस्कार (१९८७), १७ सप्टेंबर १९८८ रोजी
कुसुमाग्रज तथा वि.वा. शिरवाडकर यांना जाहिर झाला.

कुसुमाग्रज मराठी विचार मंच

भारतीय साहित्यक्षेत्रातील सर्वोच्च सन्मान, ज्ञानपीठ पुरस्कार स्वीकारताना आदरणीय कुसुमाग्रजांनी माय मराठीची गाथा सांगता सांगता व्यथा व अवस्था यावर प्रकाश झोत टाकला. इतर भाषांविषयी आदर बाळगताना मातृभाषेचा अभिमानाने स्वीकार केल्यास समाजमन अधिक सुदृढ, सृजनशील व कणखर होते, या विचारास त्यांनी अधोरेखीत केले. या विचारांनी प्रेरीत होऊन मराठी भाषेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी जनमानसात, कुसुमाग्रजांचे विचार रुजविण्यासाठी “कुसुमाग्रज मराठी विचार मंच’’ची स्थापना करण्यात आली आहे.

कुसुमाग्रज मराठी विचार मंच

“कुसुमाग्रज मराठी विचार मंच” संदर्भात प्राथमिक चर्चा – दि. २५।५।२०१९ रोजी झाली त्याप्रसंगी – डावीकडुन श्रीमती वाघमारे, सुभाष सबनीस, एस.पी.(सतीश) बोरा, डाॅ. नागेश कांबळे, अ‍ॅड. राजन मालपूरे, मुक्तेधर मुनशेट्टीवार, विष्णु शेजवळकर, सुधीर मुनशेट्टीवार.

कथामाला

संस्थेच्या उद्दिष्टानुसार शाळांमधे कुसुमाग्रज कथामालेचे आयोजन करण्यात येत आहे.

अभ्यासमाला

खुल्या ऑनलाईन परिक्षा- तज्ञांच्या सहाय्याने अभ्यासक्रम बनवून घेण्याचे काम प्रगतीपथावर आहे.लवकरच यासंदर्भात विस्तृत घोषणा केली जाईल.

लेखमाला

विविध विषयांवरील मराठी भाषेत लिहिलेल्या अभ्यासपूर्ण लेखांना या लेखमालेतर्फे प्रसिद्धी दिली जाईल. अधिक माहितीसाठी कृपया संपर्क साधावा.

अक्षर बाग

बडबड गीते, बालगीते यांचे व्हिडीओ बनवून प्रसारित करण्यासाठी आवश्यक ती पुर्वतयारी झालेली असून लवकरच विडीओ प्रदर्शित होतील.

कार्यशाळा

गुणवत्तावृध्दी कार्यशाळा व मार्गदर्शक चर्चासत्र प्रशिक्षित, अनुभवी तज्ञांच्या सहाय्याने आयोजित करण्याची प्रक्रिया चालू असून यासंदर्भात सुचना आणि मदतीचे स्वागत आहे.

सांस्कृतिक

मराठी भाषा प्रेम वृध्दीसाठी व माणसास उभारी देण्यासाठी साहित्यिक, सांस्कृतिक कार्यक्रम नियमित स्वरुपात आयोजित करण्यासाठी सुचना आणि मदतीचे स्वागत आहे.