कुसुमाग्रज मराठी विचार मंच
भारतीय साहित्यक्षेत्रातील सर्वोच्च सन्मान, ज्ञानपीठ पुरस्कार स्वीकारताना आदरणीय कुसुमाग्रजांनी माय मराठीची गाथा सांगता सांगता व्यथा व अवस्था यावर प्रकाश झोत टाकला. इतर भाषांविषयी आदर बाळगताना मातृभाषेचा अभिमानाने स्वीकार केल्यास समाजमन अधिक सुदृढ, सृजनशील व कणखर होते, या विचारास त्यांनी अधोरेखीत केले. या विचारांनी प्रेरीत होऊन मराठी भाषेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी जनमानसात, कुसुमाग्रजांचे विचार रुजविण्यासाठी “कुसुमाग्रज मराठी विचार मंच’’ची स्थापना करण्यात आली आहे.
कुसुमाग्रज मराठी विचार मंच
“कुसुमाग्रज मराठी विचार मंच” संदर्भात प्राथमिक चर्चा – दि. २५।५।२०१९ रोजी झाली त्याप्रसंगी – डावीकडुन श्रीमती वाघमारे, सुभाष सबनीस, एस.पी.(सतीश) बोरा, डाॅ. नागेश कांबळे, अॅड. राजन मालपूरे, मुक्तेधर मुनशेट्टीवार, विष्णु शेजवळकर, सुधीर मुनशेट्टीवार.