त्वरा करा ! अंतिम १० दिवस बाकी !

त्वरा करा ! अंतिम १० दिवस बाकी !

वि.वा. शिरवाडकर लिखित अत्यंत गाजलेल्या ‘नटसम्राट’ या नाटकाला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त नाटकातील स्वगतांच्या सादरीकरणाची ऑनलाईन स्पर्धा या मंचाच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्वगत सादरीकरणाचा व्हीडीओ सादर करण्याची अंतिम तारीख २० नोव्हेंबर २०२० संध्याकाळी ५ वाजेपर्यंत असून आता केवळ १० दिवस बाकी आहेत.

आजपर्यंत अनेक इच्छुकांनी आपले व्हीडीओ दिलेल्या लिंकवर अपलोड केले असून अनेक जण व्हीडीओ बनवण्याच्या तयारीत आहेत. तरी जास्तीत जास्त कलाकारांनी आपली कला सादर करण्याची ही नामी संधी सोडू नये असे आवाहन मंचाच्या वतीने करण्यात येत आहे.

लक्षात असु द्या, नटसम्राट नाटकातील कोणतेही स्वगत जास्तीत जास्त ४ मिनिटे कालावधीमधे साभिनय तोंडपाठ सादर करुन आपल्या सादरीकरणाचा मुळ व्हीडीओ म्हणजेच कोणत्याही प्रकारे संकलन अथवा सोपस्कार (editing) न केलेला व्हिडीओ स्पर्धकाने स्पर्धेत अपलोड करावा.

स्पर्धेत सहभाग नोंदणी करण्यासाठी प्रवेश फी रु.१००/- (रुपये शंभर मात्र) ऑनलाईन भरणे आवश्यक आहे. एका प्रवेश फी मधे फक्त एकच स्वगत व्हीडीओ सादर करता येईल. एकापेक्षा अधिक स्वगत व्हीडीओ सादर करायचे असल्यास प्रत्येक अतिरीक्त स्वगत व्हीडीओसाठी प्रत्येकी स्वतंत्र रुपये १००/- (रुपये शंभर मात्र) प्रवेश फी भरावी लागेल.

काही स्पर्धकांनी अजाणतेपणे एका प्रवेश फीवर एकापेक्षा अधिक व्हीडीओ सादर केले आहेत, त्यांनी उर्वरीत प्रवेशिकांची फी लवकरात लवकर भरावी. अन्यथा त्यांचे व्हीडीओ स्पर्धेतून बाद केले जातील.

त्याचप्रमाणे काही स्पर्धकांनी पार्श्वसंगीत, गाणी यांचा वापर करुन व्हीडीओ सादर केले आहेत. अशा प्रकारे संकलन केलेले व्हीडीओ स्पर्धेतून बाद केले जाऊ शकतात अशी सुचना परिक्षकांनी दिली आहे याची नोंद घ्यावी.

स्पर्धेचे नियम व अटी वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी इथे क्लिक करा.