नाशिक जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

कविवर्य कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांची जयंती व जागतिक मराठी  दिनाचे औचित्य साधून कुसुमाग्रज मराठी विचार मंच या सामाजिक संस्थेच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी नाशिक जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिक जिल्ह्यातील कोणत्याही शाळेतील पाचवी ते आठवीचे विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होऊ शकतील .

या स्पर्धेसाठी १) कवी कुसुमाग्रज २) स्वामी विवेकानंदांचे विचार ३) मराठी भाषा दिवस यापैकी कोणत्याही एका विषयावर पाच मिनिटे वक्तृत्व करायचे आहे.

स्पर्धा प्रथम तालुकास्तरावर होईल यात प्रथम पारितोषिक(१) रुपये 500, द्वितीय पारितोषिक(१) रुपये 300, तृतीय पारितोषिक(१) रुपये 200, उत्तेजनार्थ पारितोषिक(२) रुपये 100 प्रति अशी असतील. सहभागी सर्व स्पर्धकांना सहभागाचे प्रमाणपत्र दिले जाईल. तसेच सर्व शाळांना कुसुमाग्रजांची एक तस्वीर भेट मिळेल.

स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी आपली नावे https://forms.gle/Nok8iWf8dV6CJJC6A या लिंक वर गुगल फॉर्म अथवा या ७०२०५२७७७१ क्रमांकावर व्हाट्सअप द्वारा किंवा www.kusumagrajmvm.org या वेबसाईटवर दिनांक ५ फेब्रुवारी पर्यंत पाठवायची आहेत. स्पर्धा दिनांक १० ते १५ फेब्रुवारी २०२३ पर्यंत तालुका स्तरावर होतील. यातील तालुकास्तरावरील प्रथम व द्वितीय पारितोषिक विजेते विद्यार्थी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरतील

त्यासाठीचे विषय त्यांना कळविण्यात येते जिल्हास्तरावर प्रथम पारितोषिक (१)रुपये १०००/द्वितीय पारितोषिक(१) रुपये ७००, तृतीय पारितोषिक(१) रुपये ५००, व उत्तेजनार्थ दोन पारितोषिके प्रत्येकी रुपये ३०० अशी असतील. स्पर्धा दिनांक २५फेब्रुवारी २०२३ रोजी होईल. स्पर्धेची स्थळे यथावकाश कळविण्यात येतील. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष सतीश  बोरा व चिटणीस सुभाष सबनीस यांनी दिली

%d bloggers like this: