नटसम्राट स्वगत स्पर्धा – मतदान सुरु

कुसुमाग्रज मराठी विचार मंचाच्या वतीने वि.वा. शिरवाडकर लिखित अत्यंत गाजलेल्या ‘नटसम्राट’ या नाटकाला ५० वर्षे पूर्ण होत आहेत हे औचित्य साधुन “नटसम्राट” नाटकातील स्वगतांच्या सादरीकरणाची ऑनलाईन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

या स्पर्धेला महाराष्ट्र तसेच महाराष्ट्राबाहेरुन भरघोस प्रतिसाद मिळाला. अनेक गुणी कलाकारांनी आपले नाट्यगुण सादर करण्याची पर्वणी साधून आपल्या प्रवेशिका सादर केल्या. या सर्व प्रवेशिकांमधुन पात्र प्रवेशिकांचे व्हीडिओ प्रेक्षकांपुढे मतदानासाठी सादर केले जात आहेत.

परिक्षकांतर्फे शब्दोच्चार, अभिनय, दृकश्राव्य गुणवत्ता, सादरीकरण, परिणामकता अशा विविध पैलुंचा अभ्यास करुन सुयोग्य प्रवेशिकांची निवड केली जाईल. तसेच संकेतस्थळावरील व्हीडिओंना मिळणारी श्रेणी, प्रेक्षक संख्या, युट्युब चॅनेलवर मिळणार्‍या पसंतीचे शिक्के, प्रतिसाद, प्रेक्षकसंख्या या सर्वांचा साकल्याने विचार करुन परिक्षक आपला निर्णय जाहीर करतील.

परिक्षकांचा निर्णय अंतिम असेल आणि त्यासंदर्भात कोणतीही चर्चा, स्पष्टीकरण, प्रश्नोत्तरे मंचाच्या वतीने केली जाणार नाहीत याची सर्व सुजाण व्यक्तींनी नोंद घ्यावी.

खाली “कुमार गट” आणि “खुला गट” अशा दोन गटांच्या मतदानाची लिंक देण्यात आली आहे. त्यांना क्लिक करुन त्या त्या विभागातील व्हीडिओ पहाण्यासाठी उपलब्ध आहेत.

मतदानाची वेळ संपली आहे.