लोकाग्रहास्तव स्वगत स्पर्धेला मुदतवाढ

लोकाग्रहास्तव स्वगत स्पर्धेला मुदतवाढ

कुसुमाग्रज मराठी विचार मंचातर्फे आयोजित “नटसम्राट स्वगत स्पर्धेला” भरघोस प्रतिसाद मिळाला असून अनेक कलाकारांनी आपले सादरीकरणाचे व्हीडीओ सादर केले आहेत. या प्रतिसादाबद्दल मंचातर्फे सर्व सहभागी कलाकारांचे मन:पुर्वक आभार आणि शुभेच्छा !

मध्यंतरीच्या काळातील दिवाळी सणामुळे अनेकांना इच्छा असून तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही त्यामुळे दिलेल्या मुदतीत व्हीडीओ सादर करणे जमले नाही असे आयोजकांना अनेकांनी बोलून दाखवले. त्यामुळे सर्वांना जास्तीत जास्त सहभाग नोंदता यावा, आपली कला सादर करण्याची संधी मिळावी, हौशी कलाकारांना व्यासपीठ मिळावे या उद्देशाने कुसुमाग्रज मराठी विचार मंचातर्फे आयोजित “नटसम्राट स्वगत स्पर्धेच्या” सादरीकरणासाठी मुदतवाढ दिली जात आहे.

आपण आपले व्हीडीओ दिनांक ३० नोव्हेंबर २०२० संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सादर करु शकता. तरी या संधीचा जास्तीत जास्त इच्छुकांनी लाभ घ्यावा ही विनंती.

लक्षात असु द्या – अंतिम दिनांक ३० नोव्हेंबर २०२० संध्याकाळी ५ वाजेपर्यंत.

लोकाग्रहास्तव स्वगत स्पर्धेला मुदतवाढ

अंतिम दिनांक ३० नोव्हेंबर २०२० संध्याकाळी ५ वाजेपर्यंत.
त्वरा करा !