स्वगत स्पर्धेचा निकाल आणि पारितोषिक वितरण समारंभ

“कुसुमाग्रज मराठी विचार मंचा”तर्फे वि.वा. शिरवाडकर लिखित अत्यंत गाजलेल्या ‘नटसम्राट’ या नाटकाच्या स्वगत स्पर्धेचा निकाल जाहिर झाला असून दिनांक २३ डिसेंबर २०२० रोजी सायंकाळी ६.०० वाजता महाकवी कालिदास कला मंदिरात नटसम्राट नाटकाचा एकपात्री प्रयोग होणार असून याच कार्यक्रमात पारितोषिक आणि प्रमाणपत्र वितरण करण्यात येणार आहे.

“कुसुमाग्रज मराठी विचार मंचा”तर्फे वि.वा. शिरवाडकर लिखित अत्यंत गाजलेल्या ‘नटसम्राट’ या नाटकाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त नाटकातील स्वगतांच्या सादरीकरणाची ऑनलाईन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्वगत स्पर्धेला संपुर्ण महाराष्टातून तसेच महाराष्ट्राबाहेरुन भरघोस प्रतिसाद मिळाला. सदर स्पर्धा कुमार गट आणि खुला गट अशा दोन गटात घेण्यात आली होती. प्राथमिक फेरीतील पात्र प्रवेशिकांची अंतिम फेरीत निवड करुन परिक्षकांचे परिक्षण तसेच प्रेक्षकांचे ऑनलाईन मतदान घेण्यात आले. प्रेक्षकांचे मतदान मंचाच्या वेबसाईटवर (https://kusumagrajmvm.org) तसेच युट्युब चॅनेलवर घेण्यात आले होते. परिक्षकांचे गुण तसेच प्रेक्षकांची संख्या, श्रेणी, लाईक्स इत्यादी बाबींचा विचार करुन अंतिम विजेत्यांची निवड करण्यात आली.

स्पर्धेची ठळक वैशिष्ट्ये :

  • महाराष्ट्र तसेच महाराष्ट्राबाहेरुन स्पर्धकांनी सहभाग घेतला.
  • जगभरातुन प्रेक्षकांनी वेबसाईट तसेच युट्युबवर व्हीडीओ पाहून स्पर्धकांना प्रोत्साहन दिले.
  • वेबसाईट वर उपलब्ध केलेल्या न्युजलेटर सबस्क्रीप्शनला प्रतिसाद मिळाला आणि २००० पेक्षा अधिक इमेल पत्ते सबस्क्राईब झाले
  • युट्युब चॅनेलला मोठ्या प्रमाणावर सबस्क्रिप्शन होऊन ८५० पेक्षा अधिक प्रेक्षक सबस्क्राईब झाले
  • ज्येष्ट कलाकार उपेंद्र दाते आणि प्रमोद टेंबरे यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले.
  • स्पर्धा प्रमुख म्हणून शाम पाडेकर आणि सुभाष सबनीस यांनी काम पाहिले.
  • डिझाईनचे काम भुषण क्षीरसागर यांनी पाहिले.
  • व्हीडिओ संकलनाचे काम महेश कावळे यांनी पाहिले.
  • ऑनलाईन तांत्रिक सहाय्य उपेंद्र वैद्य आणि मेधा वैद्य यांनी केले.
  • सतीश बोरा, दिलीप बारावकर यांनी सर्व संबंधितांशी समन्वय साधला.

स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व कलाकारांचे, परिक्षकांचे, जगभरातील प्रेक्षकांचे मंचातर्फे हार्दिक आभार आणि मनापासून धन्यवाद.

स्पर्धेचा निकाल

कुमार गट

प्रथम क्रमांक : सोहम संदिप शहापूरकर (क्र २१), बेळगाव
द्वितीय क्रमांक : वेदिका भुषण पंचभाई (क्र ४७), नाशिक
तृतीय क्रमांक : राजसी दिपक गोजगेकर (क्र ३६), बेळगाव
उत्तेजनार्थ : युगा मिलिंद कुलकर्णी (क्र ३५),नाशिक आणि गार्गी सचिन ब्राह्मणकर (क्र ४१), नाशिक

खुला गट

प्रथम क्रमांक : तुकाराम माधव नाईक (क्र ८), मु.पो.सातपाटी, पालघर
द्वितीय क्रमांक : विवेकानंद राजाराम दासरी (क्र १६), ठाणे (पश्चिम)
तृतीय क्रमांक : सुरेंद्र जगदिश गुजराथी (क्र २७) , संगमनेर , अहमदनगर
उत्तेजनार्थ : महेंद्र शंकर गुरव (क्र ११) मु.पो. आरे, गुहागर, रत्नागिरी आणि अविनाश रामगीर गोस्वामी (क्र ४), सांगली

विजयी स्पर्धकांचे मन:पूर्वक अभिनंदन आणि सर्व स्पर्धकांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा !!

पन्नास वर्षांपूर्वी २३ डिसेंबरला या नाटकाचा पहिला प्रयोग झाला होता त्यानिमित्ताने बुधवार दिनांक २३ डिसेंबर २०२० रोजी सायंकाळी ६.०० वाजता महाकवी कालिदास कला मंदिरात नटसम्राट नाटकात प्रमुख भुमिका साकारणारे जेष्ठ कलावंत मा.उपेंद्र दाते यांचा नटसम्राट नाटकाचा एकपात्री प्रयोग आयोजित करण्यात आला आहे. याच कार्यक्रमात पारितोषिक आणि प्रमाणपत्र वितरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला सर्व नाशिककर नाट्यरसिकांनी मास्कचा वापर करुन तसेच सामाजिक अंतर पाळून उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.