मराठी भाषेविषयी मुलांमध्ये आवड निर्माण करणे यासाठी अभिनव उपक्रम

मातृभाषेतील शिक्षणामुळे विचार प्रक्रिया सशक्त व जलद होते. मुलांमध्ये भाषेची आवड निर्माण झाल्यास एकूणच सुजाण व स्वाभिमानी समाज निर्मिती होण्यास मदत होईल असे अनेक अभ्यासकांनी संशोधनांती अधोरेखित केले आहे. म्हणूनच मातृभाषेतील शिक्षणाला नवीन शिक्षण धोरणात प्राधान्य देण्यात आले आहे.

या अनुषंगाने ‘कुसुमाग्रज मराठी विचार मंचतर्फे’ सामाजिक, धार्मिक व राष्ट्रधर्म एकत्र साधत आदिवासी, जिल्हा परिषद, नगर पालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांना अंकलिपी, रंगीत सचित्रमाला, पुस्तके आणि पाटी दप्तर देण्याची योजना आखली आहे. येत्या २७ फेब्रुवारी २०२१ पासून पेठ तालुक्यातील उपक्रम प्रेमी शिक्षकांच्या व समाज सेवकांच्या सहाय्याने उपक्रमाची सुरूवात होणार आहे.

या उपक्रमासाठी छापण्यात येणारी अंकलिपी व रंगीत सचित्रमाला आकर्षक छपाई, मजबूत बांधणीयुक्त असतील. जेणेकरून लहान मुलांच्या हाताळणीतही दीर्घकाळ टिकतील अशा बनवल्या जातील.

कामकाजाची पद्धती

  • 20 ते 50 मुलामुलींच्या गटासाठी शिक्षक, गावातील व समाजसेवी संघटनांचे प्रतिनिधींची एक गट समिती नियुक्त करण्यात येईल त्याच्यामार्फत साहित्य संच देण्यात येणार्‍या मुलांच्या नोंदी घेण्यात येतील.
  • गटसमितीद्वारे त्या मुलामुलींसाठी कथामाला, व्याख्याने, कार्यशाळा, स्पर्धा आयोजित करण्यात येतील.
  • गटसमितीचे गाव, जिल्हा,विभागस्तरीय अशी रचना करून प्रोत्साहानात्मक विविध योजना राबविण्यात येतील.
  • निधी उपलब्धतेनुसार जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सामावून घेण्यात येईल.
  • गटसमितीद्वारे विद्यार्थ्यांवर होणार्‍या सकारात्मक बदलाची….नोंद घेण्यात येईल.
  • अशीच रचना इतर सर्व प्रकारच्या शाळांमध्ये राबविण्यात येईल. मात्र त्यांना संस्थेतर्फे देण्यात येणारे साहित्य सवलतीच्या दरात देण्यात येईल.
  • समित्यांना संस्थेच्या उद्दिष्टांना अनुसरून कार्य करण्याची स्वायतत्ता असेल.

आवाहन

या कामासाठी भाषा बांधवांनी जास्तीत जास्त आर्थिक सहकार्य करावे. तसेच ज्यांना समाज सेवेसाठी कार्यकर्ता म्हणून योगदान द्यावयाचे असेल अशांनी पुढे येवून संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन सतीश बोरा(अध्यक्ष), आनंद देशपांडे, श्रीधर व्यवहारे, दिलीप बारवकर, सुभाष सबनीस, जयप्रकाश मुथा यांनी केले आहे.

                              संपर्क : सतीश प्रे.बोरा
                              कुसुमाग्रज मराठी विचार मंच
                              16,बोरा बिल्डिंग, रविवार कांरजा
                              नाशिक फोनः 0253-2598480
                              संकेतस्थळः kusumagrajmvm.org

आर्थिक मदतीसाठी आपले धनादेश कुसुमाग्रज मराठी विचार मंच या नावाने पाठवावे अथवा

बँक ऑफ बडोदा,

शाखा-रविवार कांरजा, नाशिक शहर,

खाते क्र.97620100014576,

IFSC-BARB0DBRAVI

येथे भरून त्याची पावती नावासह 9373900425 येथे व्हाटस्अप करावी अथवा info@kusumagrajmvm.org या इमेलपत्त्यावर पाठवावी.

%d bloggers like this: