लवकरच ‘नटसम्राट’ स्वगत सादरीकरण स्पर्धा

आदरणीय कुसुमाग्रजांचे साहित्य, मराठी भाषा ह्याबाबत सर्वदूर प्रचार आणि प्रसार होऊन मराठी भाषेची शुध्दाशुध्दता, तिला शासन दरबारी मान मिळवून देणे, राजभाषेचा दर्जा मिळावा ह्या साठी कार्य करण्याकरीता नाशिकमध्ये “कुसुमाग्रज मराठी विचार मंच”ची स्थापना करण्यात आली आहे.


वि.वा. शिरवाडकर लिखित अत्यंत गाजलेल्या ‘नटसम्राट’ या नाटकाला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त नाटकातील स्वगतांच्या सादरीकरणाची ऑनलाईन स्पर्धा या मंचाच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे.

यासंबंधी अधिक माहिती लवकरच दिली जाईल. आपण आमच्या सोशल वेबसाईट अथवा टेलीग्राम चॅनेलला सबस्क्राईब करा अथवा आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या.

अधिक माहितीसाठी आपले नाव आणि इमेल पत्ता नोंदवा. आपणास स्पर्धेचे नियम आणि अटी जाहिर झाल्यावर इमेलमार्फत कळवण्यात येतील.

Loading
%d bloggers like this: