स्वरचित काव्यवाचन आणि निबंध स्पर्धेचा निकाल जाहिर

वि.वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रजांचा जन्म दिवस २७ फेब्रुवारी ’मराठी राजभाषा दिन’ म्हणुन साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून मंचातर्फे ’स्वरचित काव्य वाचन स्पर्धा (ऑनलाईन)’ आणि ’निबंध स्पर्धा (ऑनलाईन)’ आयोजित करण्यात आली होती.

या दोनही स्पर्धांना संपूर्ण महाराष्टातून तसेच महाराष्ट्राबाहेरुन भरघोस प्रतिसाद मिळाला. प्राथमिक फेरीतील पात्र प्रवेशिकांची अंतिम फेरीत निवड करुन परिक्षकांचे परिक्षण तसेच प्रेक्षकांचे ऑनलाईन मतदान घेण्यात आले. प्रेक्षकांचे मतदान मंचाच्या वेबसाईटवर (https://kusumagrajmvm.org) तसेच युट्युब चॅनेलवर घेण्यात आले होते. परिक्षकांचे गुण तसेच प्रेक्षकांची संख्या, श्रेणी, लाईक्स इत्यादी बाबींचा विचार करुन अंतिम विजेत्यांची निवड करण्यात आली आहे.

स्पर्धेची ठळक वैशिष्ट्ये :

  • महाराष्ट्र तसेच महाराष्ट्राबाहेरुन स्पर्धकांनी सहभाग घेतला.
  • जगभरातुन प्रेक्षकांनी वेबसाईट तसेच युट्युबवर व्हीडीओ पाहून स्पर्धकांना प्रोत्साहन दिले.
  • वेबसाईट वर उपलब्ध केलेल्या न्युजलेटर सबस्क्रीप्शनला प्रतिसाद मिळाला आणि ३००० पेक्षा अधिक इमेल पत्ते सबस्क्राईब झाले
  • युट्युब चॅनेलला मोठ्या प्रमाणावर सबस्क्रिप्शन होऊन १५०० पेक्षा अधिक प्रेक्षक सबस्क्राईब झाले
  • स्वरचित काव्यवाचन स्पर्धेचे समन्वयक म्हणून दिलीप बारवकर यांनी काम पाहिले तर सुमती पवार आणि अलका कोठावदे यांनी परिक्षण केले.
  • निबंध लेखन स्पर्धेचे समन्वयक म्हणून रंजना बोरा आणि दिलीप गोळेसर यांनी काम पाहिले तर नंदकिशोर ठोंबरे आणि संयुक्ता कुलकर्णी यांनी परिक्षण केले.

स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व कलाकारांचे,

परिक्षकांचे, जगभरातील प्रेक्षकांचे

मंचातर्फे हार्दिक आभार आणि मनापासून धन्यवाद.

स्पर्धेचा निकाल

स्वरचित काव्यवाचन स्पर्धा

प्रथम क्रमांक : महेश ठाकुरदेसाई (क्र ५), कोथरुड, पुणे
द्वितीय क्रमांक : मेधा वैद्य (क्र २९), नाशिक
तृतीय क्रमांक : अमेय वैशंपायन (क्र २१), डोंबिवली, ठाणे
उत्तेजनार्थ : मीना कोहोक (क्र ८), नाशिक आणि मेधा फेणे (क्र ६४), सांताक्रुज, मुंबई

निबंध लेखन स्पर्धा

प्रथम क्रमांक : उपेंद्र वैद्य (क्र ४), नाशिक
द्वितीय क्रमांक : प्रांजली आफळे (क्र ५), नाशिक
तृतीय क्रमांक : तुषार कुटे (क्र १), पिरपट, जुन्नर, पुणे
उत्तेजनार्थ : तानाजी पारिस्कर (क्र ६) ,सावरगाव (गोरे), पुसद, यवतमाळ आणि मुकुंद सराफ (क्र १८), विले पार्ले, मुंबई

विजयी स्पर्धकांचे मन:पूर्वक अभिनंदन आणि सर्व स्पर्धकांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा !!

आपल्या सर्वांचे सहभाग प्रमाणपत्र, विजेत्यांचे प्रमाणपत्र इमेलने पाठवण्यात येत आहे. तसेच विजेत्यांचे भेट प्रपत्र( गिफ्ट व्हाऊचर्स) दिनांक १५ मार्च २०२१ पर्यंत पोस्टाने पाठवण्यात येत आहेत.

%d bloggers like this: