‘नटसम्राट’ मधील स्वगत सादरीकरण स्पर्धा

‘नटसम्राट’ नाटकाच्या सुवर्णमहोत्सवा निमित्त आयोजित
‘नटसम्राट’ मधील स्वगत सादरीकरण स्पर्धा

आदरणीय कुसुमाग्रजांचे साहित्य, मराठी भाषा ह्याबाबत सर्वदूर प्रचार आणि प्रसार होऊन मराठी भाषेची शुध्दाशुध्दता, तिला शासन दरबारी मान मिळवून देणे, राजभाषेचा दर्जा मिळावा ह्या साठी कार्य करण्याकरीता “कुसुमाग्रज मराठी विचार मंच” ची स्थापना करण्यात आली आहे.

वि.वा. शिरवाडकर लिखित अत्यंत गाजलेल्या ‘नटसम्राट’ या नाटकाला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त नाटकातील स्वगतांच्या सादरीकरणाची ऑनलाईन स्पर्धा या मंचाच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे.

स्पर्धेचे नियम व अटी खालीलप्रमाणे :

१) स्व.वि.वा.शिरवाडकर लिखित ‘नटसम्राट’ नाटकातील कुठलेही ‘स्वगत’ स्पर्धकाने तोंडपाठ साभिनय सादर करावे.

२) सादरीकरणासाठी प्रत्येक स्पर्धकाला जास्तीत जास्त चार मिनिटांचा कालावधी देण्यात आलेला आहे.

३) आपल्या सादरीकरणाचा मुळ व्हीडीओ म्हणजेच कोणत्याही प्रकारे संकलन अथवा सोपस्कार (editing) न केलेला व्हिडीओ स्पर्धकाने kusumagrajmvm.org या वेबसाईट वरील लिंकवर दिनांक २० ऑक्टोबर २०२० सकाळी १० वाजेपासून ते २० नोव्हेंबर २०२० संध्याकाळी ५ वाजेपर्यंत अपलोड करावा. यानंतर आलेल्या प्रवेशिकांचा विचार केला जाणार नाही.

४) स्पर्धेत सहभाग नोंदणी करण्यासाठी प्रवेश फी रु.१००/- (रुपये शंभर मात्र) ऑनलाईन भरणे आवश्यक आहे. एका प्रवेश फी मधे फक्त एकच स्वगत व्हीडीओ सादर करता येईल.

एकापेक्षा अधिक स्वगत व्हीडीओ सादर करायचे असल्यास प्रत्येक अतिरीक्त स्वगत व्हीडीओसाठी प्रत्येकी स्वतंत्र रुपये १००/- (रुपये शंभर मात्र) प्रवेश फी भरावी लागेल.

त्यासंबंधीच्या खात्याची माहिती फॉर्म भरतेवेळी पहायला मिळेल. सदर शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत मिळणार नाही. शुल्क न भरल्यास व्हीडीओ स्विकारला जाणार नाही.

५) स्पर्धेत सहभाग १२ वर्षे वरील सर्वांसाठी खुला आहे.

६) आलेल्या प्रवेशिकांची नाट्यक्षेत्रातील मान्यवर परीक्षक निवड करतील. त्यासाठी उत्कृष्ठ ऑडीओ, व्हीडीओचा दर्जा, सादरीकरणाचा दर्जा, भाषेची शुध्दाशुध्दता, उच्चार, आवाजातील चढउतार, अभिनय, चेहऱ्यावरील हावभाव, भावभावना आणि वेळ या निकषांवर प्राथमिक निवड केली जाईल.

७) हि निवड केलेली स्वगते कुसुमाग्रज मराठी विचार मंचाच्या साईटवर मतदानासाठी २५ नोव्हेंबर २०२० ते १० डिसेंबर २०२० पर्यंत सगळयांना पहाता येतील.

८) या स्वगतांना मिळणारी प्रसिद्धी, लाईक, शेअर, याचे गुण आणि मान्यवर परीक्षकांचे गुण यांचा एकत्र विचार करून विजेत्यांना २ गटांत पारितोषिके देण्यात येतील.

९) परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल व तो प्रत्येक स्पर्धकावर बंधनकारक असेल.

स्पर्धेसाठी खालीलप्रमाणे पारितोषिके असतील.

पारितोषिक

प्रथम पारितोषिक

द्वितीय पारितोषिक

तृतीय पारितोषिक

उत्तेजनार्थ दोन

कुमार गट-१ वय १२ ते १८

रु. १०००/- + प्रमाणपत्र

रु. ७००/- + प्रमाणपत्र

रु. ५००/- + प्रमाणपत्र

रु. ३००/- + प्रमाणपत्र

खुला गट -२ (१८+)

रु .२०००/-+ प्रमाणपत्र

रु .१५००/-+ प्रमाणपत्र

रु .१०००/-+ प्रमाणपत्र

रु .५००/-+ प्रमाणपत्र

स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी संपर्क :

श्याम पाडेकर स्पर्धाप्रमुख मोबाइल नंबर – ९४२०५९२०३०

सुभाष सबनीस स्पर्धाप्रमुख मोबाइल नंबर – ९८८१२४८४२९

या संदर्भात आपणास कोणतीही अडचण असल्यास अगर मदत हवी असल्यास natsamratcontest@kusumagrajmvm.org या इमेल पत्त्यावर आपण संपर्क साधावा अथवा आमच्या संकेतस्थळावरील संपर्क साधा पानावर माहिती भरुन पाठवावी.

लोकाग्रहास्तव स्वगत स्पर्धेला मुदतवाढ

अंतिम दिनांक ३० नोव्हेंबर २०२० संध्याकाळी ५ वाजेपर्यंत.
त्वरा करा !