बोबड, बडबड, बालगीतांचे बालोद्यान

लहानपणीच मराठी भाषेशी गट्टी व्हावी, मराठी संस्कृतीशी मैत्री व्हावी, वाचन काक्षयाची गोडी लागावी एकुणच सदृढ मनाची, खंबीर विचाराची स्वाभिमानी भावी पिढी निपजावी या ज्ञानपीठ पुरस्कार विभुषित कवी कुसुमाग्रज, वि.वा.शिरवाडकर यांच्या विचारांनी प्रेरित होवुन कुसुमाग्रज मराठी विचार मंच ची स्थापना झाली आहे. 

इंग्रजी भाषेतील ‘नर्सरी ह्राईम्स’ व हिंदी भाषेतील बालकविता सारखा बोबडगीते,बडबडगीतेे व बालगीतांचा व्हिडीओ निर्मितीचा संकल्प हा जागतिक मराठी दिनानिमित्त करण्यात आला आहे.आधुनिक जीवनशैली,परिसर ज्ञान,सामान्य ज्ञान, विज्ञानाचे संस्कार सहज सुलभ घडतील अशा या व्हिडीओ असतील. समाजमाध्यमाद्वारे सगळयांना सहज व विनामुल्य उपलब्ध होणार्‍या या व्हिडीओ मुळे ग्रामीण भागातील, दुर्गम भागातील अबालवृध्द व विद्यार्थ्यांनाही त्याचा फायदा मिळेल. मराठीच्या इतरइ भाषाभगिनीचा ही या निर्मितीच्या प्रक्रियेत विचार करण्यात येईल. अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सतीश प्रे. बोरा यांनी दिली. 

प्राथमिक अंदाजानुसार ४ते ६ कोटी रूपयाचा निधी या उपक्रमास लागेल. या कामी लोक सहभाग व भाषा विभाग व इतर सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक संस्था याची मदत घेतली जाईल.  मराठी भाषेच्या सन्मान वृध्दींगत करणार्‍या या प्रकल्पासाठी बाल साहित्यिक, मानसशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ञ, भाषा मंत्रालय,सामाजिक विचारवंताचे सहकार्य घेण्यात येईल. अशी माहिती बोरा यांनी दिली.या ज्ञान यज्ञात सहभागी होण्यासाठी info@kusumagrajmvm.org या ईमेलवर आपली सविस्तर माहिती कळवावी.

याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष आनंद देशपांडे, चिटणीस सुभाष सबनीस, खजिनदार जयप्रकाश मुथा, विश्‍वस्त शिरीष देशपांडे, प्रा.कवयित्री सुमती पवार, श्रीमती वाघमारे ,दिलीप बारावकर,संगणक सल्लागार उपेंद्र वैद्य मिलींद कुलकर्णी आदी उपस्थित होते.