मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित स्पर्धांसाठीचे मतदान सुरु

आदरणीय कुसुमाग्रजांचे साहित्य, मराठी भाषा ह्याबाबत सर्वदूर प्रचार आणि प्रसार होऊन मराठी भाषेची शुध्दाशुध्दता, तिला शासन दरबारी मान मिळवून देणे, राजभाषेचा दर्जा मिळावा ह्या साठी कार्य करण्याकरीता “कुसुमाग्रज मराठी विचार मंच” ची स्थापना करण्यात आली आहे.

वि.वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रजांचा जन्म दिवस २७ फेब्रुवारी ’मराठी राजभाषा दिन’ म्हणुन साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून मंचातर्फे ’स्वरचित काव्य वाचन स्पर्धा (ऑनलाईन)’ आणि ’निबंध स्पर्धा (ऑनलाईन)’ आयोजित करण्यात आल्या होत्या.

सदर स्पर्धांना महाराष्ट्र तसेच महाराष्ट्राबाहेरुन उदंड प्रतिसाद लाभला. वेळेमधे आलेल्या प्रवेशिकांची सादरीकरणाचा दर्जा, काव्यातील विचार, भावभावना, वेळ तसेच ध्वनी (ऑडीओ), दृश्यता (व्हिडिओ) दर्जा या निकषांवर प्राथमिक निवड केली गेली. प्राथमिक फेरीत पात्र ठरलेल्या प्रवेशिका कुसुमाग्रज मराठी विचार मंचाच्या संकेत स्थळावर तसेच युट्युब चॅनेलवर मतदानासाठी तसेच मतदान संपल्यावर सुद्धा सगळयांना पहाता येतील.

निबंध स्पर्धा आणि काव्यवाचन स्पर्धांमधील प्रवेशिका संकेतस्थळावर पहाण्यासाठी – https://kusumagrajmvm.org
संकेतस्थळावर आपण आपले मत १ ते ५ या श्रेणीमधे देवू शकता.

काव्यवाचन स्पर्धेमधील प्रवेशिका युट्युबवर पहाण्यासाठी – https://youtube.com/c/KusumagrajMVM
युट्युबवर आपले मत लाईक (आवडले) अथवा प्रतिसाद (कमेंट) स्वरुपात देऊ शकता.

मतदानाची वेळ

दिनांक २१ फेब्रुवारी २०२१ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत आहे

याची कृपया नोंद घ्यावी.