मराठी भाषेची दशा आणि दिशा : वेबिनार संपन्न

समाजमाध्यमे, वृत्तपत्रे आणि दूरचित्रवाणी – वाहिन्या अशा सर्वच ठिकाणी आजकाल मराठी भाषेची अतिशय हेळसांड होताना दिसते. या अतिशय महत्त्वाच्या विषयावर आपल्याशी संवाद साधण्यासाठी आम्ही नागपूर येथील नामवंत साहित्यिक डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांना आमंत्रित केले होते. हा कार्यक्रम रविवार दि. २९ ऑगस्ट २०२१ यादिवशी सकाळी ११ वाजता दूर दृश्य प्रणालीच्या साहाय्याने झाला. डॉ. जोशी यांनी “मराठी भाषेची दशा आणि दिशा” या विषयावर मार्गदर्शन अतिशय सखोल विश्लेषण केले आणि संयत शब्दांमधे आजचे वास्तव मांडले.

कार्यक्रमाच्या सुरवातीला श्री. सतीश बोरा यांनी मनोगत मांडले. श्री. गिरीश पिंपळे यांनी डॉ जोशी यांची ओळख करुन दिली. ज्यांना हा कार्यक्रम प्रत्यक्ष पहाणे शक्य झाले नाही त्यांच्यासाठी युट्युबवर व्हीडिओ उपलब्ध आहे.

भविष्यात अशाच अनेक कार्यक्रमांचे आयोजन संस्थेमार्फत केले जाणार आहे. तरी आपण इमेल न्युजलेटर किंवा युट्युब चॅनेल किंवा टेलिग्राम चॅनेलला नोंदणी करावी ही विनंती.

%d bloggers like this: