मराठी दिनानिमित्त स्वरचित काव्यवाचन आणि निबंध लेखन स्पर्धा

वि.वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रजांचा जन्म दिवस २७ फेब्रुवारी ’मराठी राजभाषा दिन’ म्हणुन साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून मंचातर्फे ’स्वरचित काव्य वाचन स्पर्धा (ऑनलाईन)’ आणि ’निबंध स्पर्धा (ऑनलाईन)’ आयोजित करण्यात आल्या आहेत.

स्वरचित काव्य वाचन स्पर्धेत भाग घेण्यासाठी स्पर्धकाने स्वत: लिहिलेल्या कवितेच्या वाचनाचा कोणत्याही प्रकारे संकलित न केलेला व्हीडिओ सादर करावा. विषयाचे बंधन नसून जास्तीत जास्त वेळ ४ मिनिटे इतकी आहे.

निबंध लेखन स्पर्धेत (१) मराठीचे रक्षकच मारेकरी? (२) २१व्या शतकातील ललित साहित्य (३) परभाषेतील शब्द मराठीला प्रदुषित करतात? यापैकी एका विषयावर २००० शब्दांपर्यंत निबंध अपेक्षित आहे.

स्वरचित काव्य वाचन स्पर्धा नियम

१) स्पर्धा १४ वर्षावरील सर्वांसाठी खुली असेल.

२) स्पर्धकाने स्वत: लिहिलेल्या, आधी कुठेही प्रकाशित अथवा प्रसिद्ध न झालेली आणि इतर कोणत्याही स्पर्धेमधे सहभागासाठी न पाठवलेली मराठी भाषेतील कवितेचा स्वत: केलेल्या अभिवाचनाचा कोणत्याही प्रकारे संकलित न केलेला व्हीडिओ सादर करावा.

३) सादरीकरणासाठी प्रत्येक स्पर्धकाला जास्तीत जास्त चार (४) मिनिटांचा कालावधी देण्यात आलेला आहे.

४) आपल्या सादरीकरणाचा कोणत्याही प्रकारे संकलित न केलेला मूळचा व्हिडीओ स्पर्धकाने kusumagrajmvm.org या संकेत स्थळावर दिलेल्या लिंकवर दिनांक ०५ फेब्रुवारी २०२१ संध्याकाळी पाच (५) वाजेपर्यंत अपलोड करावा. यानंतर आलेल्या प्रवेशिकांचा विचार केला जाणार नाही.

५) स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सहभाग शुल्क रु.१००/- (अक्षरी रु.शंभर मात्र) आहे. सदरचे शुल्क ऑनलाईन पध्दतीने जमा करावे. सदर फी कोणत्याही परिस्थितीत परत मिळणार नाही. एकापेक्षा अधिक कविता सादर करायची असल्यास प्रत्येक अतिरीक्त कवितेसाठी प्रत्येकी स्वतंत्र रुपये १००/- (रुपये शंभर मात्र) प्रवेश फी भरावी लागेल.

६) वेळेमधे आलेल्या प्रवेशिकांची सादरीकरणाचा दर्जा, काव्यातील विचार, भावभावना, वेळ तसेच ध्वनी (ऑडीओ), दृश्यता (व्हिडिओ) दर्जा या निकषांवर प्राथमिक निवड केली जाईल.

७) प्राथमिक फेरीत पात्र ठरलेल्या प्रवेशिका कुसुमाग्रज मराठी विचार मंचाच्या संकेत स्थळावर तसेच युट्युब चॅनेलवर मतदानासाठी १० फेब्रुवारी २०२१ ते २० फेब्रुवारी २०२१ संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सगळयांना पहाता येतील.

८) या कवितांना मान्यवर परीक्षकांचे गुण आणि मिळणारी प्रसिद्धी, लाईक, शेअर, याचे गुण यांचा एकत्र विचार करून पहिल्या पाच विजेत्यांना पारितोषिके देण्यात येतील.

९) परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल व तो प्रत्येक स्पर्धकावर बंधनकारक असेल आणि या संदर्भात कोणताही पत्रव्यवहार अथवा चर्चा होणार नाही.

१०) संस्थेतर्फे प्रकाशित केल्या जाणा-या मुद्रित, अथवा डिजीटल अथवा तत्सम कोणत्याही प्रकारच्या माध्यमांमधे या स्पर्धेसाठी सादर केलेल्या कवितांचा समावेश केला जाऊ शकतो, त्याबद्दल स्पर्धकाची कोणत्याही प्रकारची हरकत नसेल. तसेच यासंदर्भात कोणीही कोणत्याही प्रकारची हरकत घेतल्यास, अशा सर्व हरकतींचे निराकरण स्पर्धकाने स्वत:च्या जबाबदारीवर करणे आवश्यक राहील.

११) स्पर्धेसाठी खालीलप्रमाणे पारितोषिके असतील. परितोषिक स्पर्धेच्या प्रायोजकांतर्फे दिल्या गेलेल्या भेट प्रपत्र (Gift Vouchers) च्या स्वरुपात दिले जाईल आणि प्रमाणपत्र इमेलमार्फत पाठवले जाईल. याशिवाय स्पर्धेत सहभाग घेणा-य़ा प्रत्येकाला सहभाग प्रमाणपत्र इमेलद्वारे दिले जाईल.

प्रथम पारितोषिक रु. २०००/- + प्रमाणपत्र
द्वितीय पारितोषिक रु. १५००/- + प्रमाणपत्र
तृतीय पारितोषिक रु. १०००/- + प्रमाणपत्र
उत्तेजनार्थ दोन रु. ५००/- + प्रमाणपत्र


स्वरचित काव्य वाचन स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी संपर्क :
स्पर्धा समन्वयक : दिलीप बारवकर (९८२२४ ०१२०५) आणि सुमती पवार (९७६३६ ०५६४२)

निबंध स्पर्धा नियम

१) स्पर्धा १४ वर्षांवरील सर्वांसाठी खुली असेल.

२) स्पर्धकाने दिलेल्या विषयांपैकी कोणत्याही एका विषयावरील स्वत: लिहिलेला निबंध मराठी भाषेत देवनागरी युनिकोड फॉंटचा वापर करुन वर्ड (Microsoft Word – .docx) फाईलच्या स्वरुपात सादर करावा. सदर निबंध आधी कुठेही प्रकाशित अथवा प्रसिद्ध झालेला नसावा, तसेच इतर कोणत्याही स्पर्धेमधे सहभागासाठी पाठवलेला नसावा.

३) निबंधाची शब्द मर्यादा कमीत कमी १५०० शब्द असून जास्तीत जास्त २००० शब्द इतकी आहे.

४) आपला निबंध स्पर्धकाने kusumagrajmvm.org या संकेत स्थळावर दिलेल्या लिंकवर दिनांक ०५ फेब्रुवारी २०२१ संध्याकाळी पाच (५) वाजेपर्यंत अपलोड करावा. यानंतर आलेल्या प्रवेशिकांचा विचार केला जाणार नाही.

५) स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सहभाग शुल्क रु.१००/- (अक्षरी रु.शंभर मात्र) आहे. सदरचे शुल्क ऑनलाईन पध्दतीने जमा करावे. सदर फी कोणत्याही परिस्थितीत परत मिळणार नाही. एकापेक्षा अधिक निबंध सादर करायचे असल्यास प्रत्येक अतिरीक्त निबंधासाठी प्रत्येकी स्वतंत्र रुपये १००/- (रुपये शंभर मात्र) प्रवेश फी भरावी लागेल.

६) आलेल्या प्रवेशिकांमधून निबंधातील विचार, विषयाला दिलेला न्याय, मांडणी, वाक्यांची रचना, भाषेचे सौष्ठव, आणि शब्दांची मर्यांदा इत्यादी निकषांवर प्राथमिक निवड केली जाईल.

७) प्राथमिक फेरीत पात्र ठरलेल्या प्रवेशिका कुसुमाग्रज मराठी विचार मंचाच्या वेबसाईटवर मतदानासाठी १० फेब्रुवारी २०२१ ते २० फेब्रुवारी २०२१ संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सगळयांना पहाता येतील.

८) या निबंधांना मिळणारी प्रसिद्धी, श्रेणी याचे गुण आणि मान्यवर परीक्षकांचे गुण यांचा एकत्र विचार करून पहिल्या पाच विजेत्यांना पारितोषिके देण्यात येतील.

९) परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल व तो प्रत्येक स्पर्धकावर बंधनकारक असेल आणि या संदर्भात कोणताही पत्रव्यवहार अथवा चर्चा होणार नाही.

१०) संस्थेतर्फे प्रकाशित केल्या जाणा-या मुद्रित, अथवा डिजीटल अथवा तत्सम कोणत्याही प्रकारच्या माध्यमांमधे या स्पर्धेसाठी सादर केलेल्या निबंधांचा समावेश केला जाऊ शकतो, त्याबद्दल स्पर्धकाची कोणत्याही प्रकारची हरकत नसेल. तसेच यासंदर्भात कोणीही कोणत्याही प्रकारची हरकत घेतल्यास, अशा हरकतींचे निराकरण स्पर्धकाने करणे आवश्यक राहील.

११) निबंधासाठी विषय :

१) मराठीचे रक्षकच मारेकरी?
२) २१व्या शतकातील ललित साहित्य
३) परभाषेतील शब्द मराठीला प्रदुषित करतात?

१२) स्पर्धेसाठी खालीलप्रमाणे पारितोषिके असतील. परितोषिक स्पर्धेच्या प्रायोजकांतर्फे दिल्या गेलेल्या भेट प्रपत्र (Gift Vouchers) च्या स्वरुपात दिले जाईल आणि प्रमाणपत्र इमेलमार्फत पाठवले जाईल. याशिवाय स्पर्धेत सहभाग घेणा-य़ा प्रत्येकाला सहभाग प्रमाणपत्र इमेलद्वारे दिले जाईल.

प्रथम पारितोषिक रु. २०००/- + प्रमाणपत्र
द्वितीय पारितोषिक रु. १५००/- + प्रमाणपत्र
तृतीय पारितोषिक रु. १०००/- + प्रमाणपत्र
उत्तेजनार्थ दोन रु. ५००/- + प्रमाणपत्र

निबंध स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी संपर्क
स्पर्धा समन्वयक : रंजना बोरा (९४०४५ ३६५१०) आणि विजय गोळेसर (९४२२७ ६५२२७)

बक्षीस प्रायोजक

स्पर्धेची वेळ संपली आहे. धन्यवाद !