माय मराठीवर अविरत अन्याय होत आहे.शासन दरबारी दूजाभाव होत आहे. या मातेची मुलेच तिचे लचके तोडताहेत!वास्तविक मातृभाषेतील शिक्षणामुळे सजग,सक्षम पिढी तयार होते, हे संशोधनाअंती ही अधोरेखित झालेय. परंतू मराठीची परवड जीवघेणी होत आहे. हि व्यथा घेऊन कण्हत बसण्यात काय हशील?…
लहानपणीच मराठी भाषेशी गट्टी व्हावी, मराठी संस्कृतीशी मैत्री व्हावी, वाचन काक्षयाची गोडी लागावी एकुणच सदृढ मनाची, खंबीर विचाराची स्वाभिमानी भावी पिढी निपजावी या ज्ञानपीठ पुरस्कार विभुषित कवी कुसुमाग्रज, वि.वा.शिरवाडकर यांच्या विचारांनी प्रेरित होवुन कुसुमाग्रज मराठी विचार मंच ची स्थापना झाली…
समाजमाध्यमे, वृत्तपत्रे आणि दूरचित्रवाणी – वाहिन्या अशा सर्वच ठिकाणी आजकाल मराठी भाषेची अतिशय हेळसांड होताना दिसते. या अतिशय महत्त्वाच्या विषयावर आपल्याशी संवाद साधण्यासाठी आम्ही नागपूर येथील नामवंत साहित्यिक डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांना आमंत्रित केले आहे. हा कार्यक्रम दूर दृश्य…
नमस्कार संस्थेतर्फे ऑनलाईन दिवाळी अंक. मराठी साहित्य विश्वामधे दिवाळी अंकांची समृद्ध आणि अभिमानास्पद परंपरा आहे. गेल्या अनेक दशकांपासून विविध विषयांना वाहिलेले दर्जेदार दिवाळी अंक मराठी तसेच अमराठी रसिकांच्या मनात स्थान मिळवून आहेत आणि ही परंपरा डिजीटल युगात सुद्धा खंडीत झालेली…
मातृभाषेतील शिक्षणामुळे विचार प्रक्रिया सशक्त व जलद होते. मुलांमध्ये भाषेची आवड निर्माण झाल्यास एकूणच सुजाण व स्वाभिमानी समाज निर्मिती होण्यास मदत होईल असे अनेक अभ्यासकांनी संशोधनांती अधोरेखित केले आहे. म्हणूनच मातृभाषेतील शिक्षणाला नवीन शिक्षण धोरणात प्राधान्य देण्यात आले आहे. या…
वि.वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रजांचा जन्म दिवस २७ फेब्रुवारी ’मराठी राजभाषा दिन’ म्हणुन साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून मंचातर्फे ’स्वरचित काव्य वाचन स्पर्धा (ऑनलाईन)’ आणि ’निबंध स्पर्धा (ऑनलाईन)’ आयोजित करण्यात आली आहे. यासंबंधी अधिक माहिती लवकरच दिली जाईल. आपण…
“कुसुमाग्रज मराठी विचार मंचा”तर्फे वि.वा. शिरवाडकर लिखित अत्यंत गाजलेल्या ‘नटसम्राट’ या नाटकाच्या स्वगत स्पर्धेचा निकाल जाहिर झाला असून दिनांक २३ डिसेंबर २०२० रोजी सायंकाळी ६.०० वाजता महाकवी कालिदास कला मंदिरात नटसम्राट नाटकाचा एकपात्री प्रयोग होणार असून याच कार्यक्रमात पारितोषिक आणि…
आदरणीय कुसुमाग्रजांचे साहित्य, मराठी भाषा ह्याबाबत सर्वदूर प्रचार आणि प्रसार होऊन मराठी भाषेची शुध्दाशुध्दता, तिला शासन दरबारी मान मिळवून देणे, राजभाषेचा दर्जा मिळावा ह्या साठी कार्य करण्याकरीता नाशिकमध्ये “कुसुमाग्रज मराठी विचार मंच”ची स्थापना करण्यात आली आहे. वि.वा. शिरवाडकर लिखित अत्यंत…